सोलापूर-शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस आमदार हे भडकल्या.महिलांना वस्तू म्हणून समजणे,त्यांनी काय खावे,त्यांनी कसे वागावे हे सांगणं म्हणजे महिलांवर प्रतिबंध आणणे.देशप्रेम आम्हाला शिकवू नका अशी घणाघाती टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी संभाजी भिडे व भाजपावर केली आहे.शिवप्रतिष्ठानचे संस्था संभाजी भिडे यांनी मंत्रालयात जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्या भेटीनंतर भिडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे मंत्रालयातून बाहेर पडत असताना एका महिला पत्रकाराला भिडेंनी कुंकू लावण्याचा सल्लाही दिला. संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो या विधानावर सर्व महिला स्तरातून संभाजी भिडेंवर टीका केली जात आहे.

भारत जोडो यात्रेसाठी झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी भिडेंवर केली टीका-
काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी हे सध्या भारत जोडो यात्रे निमित्ताने महाराष्ट्र राज्यात येत आहेत.सोलापुरातील असंख्य कार्यकर्ते हे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होतील ,त्याचे नियोजन कसे असेल,याबाबत सोलापूर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर प्रणिती शिंदेनीनी खडे बोल सुनावले.महिलांनी कसे रहावे,कसे वागावे यावर हे बोलणारे कोण आहेत.उलट यांच्या सरकारच्या कार्यकाळात महिलांवर अधिक अत्याचार झाले आहेत.

देशप्रेम तर आमच्या हृदयात;यांचं तर पक्षप्रेम-
एका महिलेला संभाजी भिडेंनी असे वक्तव्य केल्याने महिला वर्गातून टीका केली जात आहे.त्यावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी संभाजी भिडेंना सल्ला दिला आहे,महिलांनी कसे रहावे,कसे वागावे हे आम्हाला शिकवू नका,आमच्या हृदयात देशप्रेम आहे.तुमच्या सारखा पक्षप्रेम नाही असे प्राणिती शिंदे म्हणाल्या.