रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणार्या दोन एक्स्प्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे. दिवाळी कालावधीत कोकण रेल्वे मार्ग लावणारे गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हापा-मडगाव (22908) या गाडीला काल बुधवारी दि. 2 नोव्हेंबरच्या फेरीपासून जोडण्यात आला असून याच गाडीच्या मडगाव-हापा (22907) या गाडीसाठी 4 नोव्हेंबरला जादा डबा जोडला जाणार आहे. पोरबंदर ते कोचुवेली या गाडीला दि. 3 नोव्हेंबर रोजीच्या फेरीसाठी तर कोचीवेली-पोरबंदर या फेरीसाठी 6 नोव्हेंबर रोजी स्लीपरचा जादा डबा जोडला जाणार आहे.