पुणे: पुण्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या त्या घटनेन अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका महिलेला पोलीस कॉन्स्टेबलन मारहाण केली होती. त्या महिलेनं आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचा आरोप संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर केला होता.

महिलेनं याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता त्या पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

पुण्यातील मंडईमध्ये बांगड्यांचं दुकान चालवणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यात पोलिस कॉन्स्टेबलचा सहभाग होता. असा आरोप त्या महिलेनं केला होता. त्या मारहाणीमध्ये महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती.

घटना नेमकी कशी घडली

महिलेनं पोलीस कॉन्स्टेबलला नो पार्किंगमध्ये गाडी लावण्यास विरोध केला होता. त्यामुळे तिला मारहाण करण्यात आली होती. राहुल शिंगे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्यावर आता निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.