चिपळूण : 'तू इथं थांबू नकोस चोऱ्या होतायत, चल तु पोलीस स्टेशनला चल' असे सांगून चिपळुणात एका तरुणाला लुटण्याचा प्रकार घडला. मात्र तरुणाने पोलिस स्थानकात फिर्याद देताच चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसाना यश आलं आहे. पोलिस त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. अनिस जहिर कादरी (२५ रा. नांदगाव, मुस्लिम मोहल्ला ता.खेड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची तक्रार राहित अलिनूर इस्लामिया ( १९ वर्ष .रा. फरशी तिठा, चिपळूण) याने चिपळूण पोलिस स्थानकात दिली. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी घडली.

चिपळूण पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहिती नुसार, राहित अलिनूर इस्लामिया हा तरुण प्लास्टरचा व्यवसाय करतो. २७ ऑक्टोबर रोजी दु.२ वा २० वा वाजण्याच्या सुमारास अनिस कादरी याने राहित याला थांबवले. त्यानंतर त्याला “इधर बहुत चोरी हो रही है, चल तु पोलीस स्टेशन में चल, उघर जाके किसको फोन करना हे कर, पुलीस थाने में साईन कर के छोड़ देता हु" असे हिंदीमध्ये बोलून पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा बहाणा केला बावशेवाडी मार्गे गुहागर बायपास रोडवर गाडी लावून त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. पॅन्टचे उजव्या खिशामध्ये असलेला रिअल मी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट चोरून नेला. राहित याने दिलेल्या फिर्यादीवरुन अनिस जहीर काद्री, याला ताब्यात घेण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाचे दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

 या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक रत्नदीप साळोखे आणि पोलीस करीत आहेत.