दिनेश रमाकांत गुजराथी मंडल अधिकारी कशेळे याला लाचलुचपत विभागाने सात हजाराची लाच स्वीकारताना पंजाबराव उगले पोलिस अधीक्षक एसीबी ठाणे परीक्षेत्र व अनिल घेरडीकर, अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी ठाणे परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे सहपोलीस उपनिरीक्षक सोंडकर, संदेश शिंदे, दिपाली गणपते यांनी ही कारवाई करुन लाचखोर गुजराथीला अटक केली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की यातील तक्रारदार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत रीकव्हरी एजंट आहेत. मौजे जामरुंग, ता. कर्जत येथील रो हाऊस, नं ६३, इलेजंट कॉम्प्लेक्स प्लॉट नं. १९३, नवीन २६२ हा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून सिल करण्यासाठी न्यायलयाने आदेश दिला असता त्या आदेशाचे पालन करण्याकरता तक्रारदार यांनी दिनेश गुजराथी यांना विनंती केली. परंतू सदरचा रो हाऊस सिल करण्यासाठी मंडल अधिकारी गुजराथी याने १५००० ची लाच मागितली. तडजोड अंती १०००० रुपये देण्याचे मान्य झाले. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने ३१/१०/२०२२ रोजी पडताळणी करुन २/११/२०२२ रोजी प्रत्यक्षात ७००० रुपयाची लाच स्वीकारताना गुजराथी याला अटक करुन त्यांच्याकडून पंचासमक्ष ७००० रुपये हस्तगत करण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे.
गुजराथी हा मंडल अधिकारी नेहमीच वादग्रस्त ठरला असून अनेकवेळा पैशाकरता लोकांची अडवणूक करुन त्रास देतो. गुजराथी यांनी आजपर्यंत किती अवैद्यरित्या माया कमवली याची चौकशी होणे गरजेचे आहे. या कारवाईमुळे कर्जत तालुक्यात खळबळ उडाली असून अनेक लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.