कन्नड तालुक्यातील नागद येथील सेवाभावी शिवगर्जना मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण राजेंद्र ठाकरे व भगवान ठाकरे सर मित्र मंडळाच्या वतीने व डॉक्टर दिलीपसिंग राजपूत यांच्या सहकार्याने नागद ते जामडी या तीन किमी रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले. तीन वर्षापासून आमदार उदयसिंग राजपूत यांच्या निष्क्रियतेमुळे नागद ते जामडी या तीन किमी जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक म्हातारी माणसे या खड्ड्यांमध्ये आपले अवयव गमावून बसले. कन्नड घाट बंद असल्यावर याच रस्त्याने प्रचंड प्रमाणात रहदारी असते. परंतु आमदारांना याविषयी बिलकुल कळवळा दिसून आला नाही.  भाजपाचे तालुका सरचिटणीस भगवान ठाकरे यांनी या संदर्भात शिवगर्जना मित्र मंडळाशी चर्चा केली व लगेचच सर्व तरुणांनी मिळून खड्डे बुजविण्याचे ठरविले. तीन किमी व नागद ते प्रेमनगर एक किमी असे एकूण चार किमी चे खड्डे बुजविण्यात आले. या कामी सहा ट्रॅक्टर व एक जेसीबी तसेच 50 ते 60 तरुण कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे काम पूर्ण केले. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी एकूण 68 ट्रिपा मुरूम लागला. खड्डे बुजवल्यामुळे परिसरातील वाहनधारकांनी, नागरिकांनी, अबालवृद्धांनी शिवगर्जना मित्र मंडळाचे आभार मानले आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

             याप्रसंगी भगवान ठाकरे, दिनेश राजपूत, राजधर अहिरे ,नामदेव

 लोदवाळ ,बोला महाजन, अजित महाजन, महावीर जैन, लखन राजपूत, किरण ठाकरे, किरण पाटील, राहुल पाटील, भैय्या पाटील, अमोल ठाकरे, गोपाळ ठाकरे, समाधान पाटील( महिंद्र), बाबाजी ठाकरे, रघुनाथ ठाकरे, अविनाश पाटील, ईश्वर जाधव, ज्ञानेश्वर ठाकरे, विकास पाटील, दीपक ठाकरे, रोहित ठाकरे, श्याम ठाकरे, शांताराम ठाकरे, सागर ठाकरे, भारत ठाकरे, भारत पाटील, नितीन पाटील, छोटू नाईक, सोनू माळी, वसंत नाईक, यांची उपस्थिती होती.आमदाराच्या घरासमोरही टाकला मुरूम

नागद ते जामडी या रस्त्यावर आमदाराच्या घराचे कोट्यावधी रुपयाचे काम चालू आहे. परंतु या रस्त्यावर प्रचंड खड्डे होते ते आज शिवगर्जना मित्र मंडळाच्या वतीने बुजविण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर चक्क बारा ट्रीप मुरूम लागला आहे.

                 ● प्रतिक्रिया ●

 जे आमदार आपल्या घरासमोरील खड्डे बुजवू शकत नाही, त्यांच्या आखत्यारीतला तीन किमी चा रस्ता मंजूर करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे. हे केवळ नागद मध्येच नाही तर सर्व तालुक्याची रस्त्याची दुरावस्था आहे. त्यांचे कार्यकर्ते सामान्य लोकांना माती खाऊ घालू अशी धमकी देतीत, परंतु आज त्यांच्याच घरासमोर माती टाकून सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना जाण्या येण्यासाठी रस्ता तयार करून दिला आहे. येणाऱ्या काळात जनताच आमदारांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही.

   

                           भगवान ठाकरे

                         तालुका सरचिटणीस

                        भाजपा कन्नड तालुका