प्रतिनिधी )-श्रीसाईबांचे गुरू सेलूचे श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या संस्थान साठी विविध विकास कामे करून भक्तांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्या साठी सभागृह,रस्ते,भक्तनिवास बांधकामा साठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी शिवसेनेचे पाथरीचे माजी आमदार हरीभाऊ लहाने काका यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती. लहाने यांची ही मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ मान्य करत पर्यटन सचिव यांना निधी साठी चे निर्देश दिल्याची माहिती माजी आ लहाने यांनी बोलतांना दिली.
या वेळी त्यांच्या सोबत शिवसेना शिंदे गटाचे पाथरी तालुका प्रमुख गोविंद गायकवाड,सेलुचे माजी नगराध्यक्ष संदिप लहाने,माजी नगरसेवक अवी शेरे,संतोष रोडगे आदींची उपस्थिती होती.
सेलू येथे दर वर्षी श्री केशवराज बाबासाहेब महाराजांची कर्मभूमी असलेल्या या तिर्थस्थळी मोठी यात्रा भरत असते.या ठिकाणी मराठवाड्याच्या काना कोप-यातून भाविकभक्त मोठ्या प्रमाणात सेलू येथे येत असतात.या भक्तां साठी सोईसुविधा म्हणून भक्तनिवास,सभागृह,आणि रस्ते या साठी माजी आ हरिभाऊ लहाने काका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत दोन कोटी रुपये विकास निधीची मागणी केली होती. त्याला तात्काळ मंजुरी देत पर्यटन सचिवांना या साठी निधी देण्याचे निर्देश दिल्याची माहिती माजी आ हरिभाऊ लहाने काका यांनी दिली.