औरंगाबाद : पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आपली मैत्रीण ईशा झा यांच्यासोबत काही वर्षांपासून राहत होते . त्यांच्या राजकीय , सामाजिक व्यासपीठावरही ईशा यांची उपस्थिती असायची . मात्र आता या दोघांमध्येही बिनसले असून प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आहे . चारित्र्यावर संशय घेऊन हर्षवर्धन यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार ईशा यांनी कन्नड पोलिस ठाण्यात दिली आहे . त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे . आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचण्यासाठी ईशा यांनी एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला . रडवेल्या ` सुरात त्या म्हणतात , ' हर्षवर्धन यांनी मला बेदम मारहाण केली , केस ओढले , मुका मार दिला . मला हे सहन होत नाही . माझे नाव इतरांशी जोडून ते नेहमीच संशय घेतात . स्वत : मात्र बाहेर घाण करतात व मला त्रास देतात . ते बदलतील असे वाटत होते , पण आता सहन होत नाही . मी पोलिसांत तक्रार दिलीय , माहीत नाही काय होईल ते . पण मी आता कन्नड सोडून चाललेय , पुन्हा कधीच येणार नाही दरम्यान , हर्षवर्धन यांनी सांगितले , ' आमचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणून इतरांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये . प्रत्येकाच्या घरी भांडणे होतात . पण सातत्याने आमच्या कुटुंबाबाबतच बोलले जाते . विरोधकांनी आधी त्यांच्या घरात काय चाललेय ते पाहावे . ' कोण आहेत ईशा मूळच्या बिहारच्या असलेल्या ईशा अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होत्या . त्या मानसोपचारतज्ज्ञ आहेत . पुण्यात त्या मानसोपचाराचे क्लिनिकही चालवतात . मध्यंतरी पुण्यातच ईशा यांच्यासोबत जात असताना हर्षवर्धन यांनी एका व्यक्तीला जबर मारहाण केली होती . त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता . तेव्हापासून ईशा व त्यांचे संबंध समोर आले . पहिल्या पत्नीपासून हर्षवर्धन विभक्त झाल्यानंतर ईशा कन्नडमध्ये येऊन राहू लागल्या . हर्षवर्धन यांच्या राजकीय , सामाजिक व्यासपीठावरही त्या असायच्या . मात्र आता या दोघांचेही बिनसले आहे .