संगमेश्वरात वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी जनजागृतीच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. चोरांना प्रतिबंध करण्यासाठी आणि घडलेल्या गुन्ह्याची उकल होण्यासाठी, चोरट्यांवर वचक राहण्यासाठी बाजारपेठ, गजबजलेली ठिकाणे, मंदिर आदी ठिकाणी नागरिकांनी सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत अशी सूचना संगमेश्वर पोलिसांनी केली आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

गावांतील मंदिरे चोरटे लक्ष्य करत आहेत. मंदिरातील दानपेट्या फोडून पैसे लांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून कॅमेरे बसवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. नुकत्याच संगमेश्वर मध्ये एकाच रात्रीत मंदिरातील ४ दानपेटी फोडण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांची मागणी

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संगमेश्वर येथील आठवडा बाजार समोर असलेल्या कोंड, असुर्डे पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सोनवी पुलावर आणि परिसरात पूर्ण काळोख असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळ काढतात अशा ठिकाणी लाईट व सीसीटिव्ही बसविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.