कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हसळा पोलिस आणि नगर पंचायत प्रशासनाचे मोठे योगदान.
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारने ठरविले नुसार म्हसळा तालुक्यात एकता दौड आणि सामुहिक एकतेची शपथ घेऊन उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.एकता दौडमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हसळा पोलिस आणि नगर पंचायत प्रशासनाचे मोठे योगदान दिसुन आले.सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यानंतर देशाची राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी दिलेल्या योगदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी म्हणुन सरकारचे माध्यमातुन एकता दिवस साजरा करण्यात आला.सरदार पटेल हे भारताचे ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जातात.स्वातंत्र्यानंतर खासगी संस्थानांचे भारतात विलिनीकरण घडवून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली व त्यामुळे एकसंघ आधुनिक भारताची निर्मिती झाली.‘राष्ट्रीय एकता दिवस’ ही एक लोकप्रिय चळवळ व्हावी,या उद्देशाने म्हसळा तालुक्यात विविध उपक्रम राबविले आहेत त्यात विविध ठिकाणी ‘एकतेसाठी दौड’ (रन फॉर युनिटी) आयोजित केली होती.म्हसळा शहरात जान्हवी (करडे)पेट्रोल पंप येथून अंजुमन हायस्कूल पर्यंत म्हसळा तहसिल,पोलिस ठाणे,नगर पंचायत,पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी आणि शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेत एकता दौड संपन्न झाली.सांगता समारंभाला राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.एकता दौड मध्ये प्रामुख्याने निवासी नायब तहसीलदार जे.एम.तेलंगे,पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे,मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,उदय कळस,प.स.कक्ष अधिकारी दिघीकर,नगरसेवक शाहिद जंजिरकर,नगर सेविका सरोज म्हशिलकर,करण गायकवाड,मंगेश म्हशिलकर नगर पंचायतीच्या अधिकारी दिपल मुंडये,प्रशांत करडे,दिपाली चव्हाण,संतोष कुडेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. एकता दौड मध्ये पोलीस पाटील,पोलीस मित्र,दक्षता समिती सदस्य,शांतता समिती सदस्य,वसंतराव नाईक कॉलेज,न्यू इंग्लीश स्कूल,अंजुमन ईस्लाम हायस्कूल,आयडीयल इंग्लीश स्कूल शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग होता.अशाच प्रकारे तालुक्यातील खरसई,मेंदडी,खामगाव,आंबेत आदी मोठ्या लोकवस्ती असलेल्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणुन साजरी करण्यात आली.