येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; गुटखा व टेम्पो पोलिसांनी केला जप्त
पुणे : कोंढवा येथून पुणे नगर रोडने वाघोली येथे जाणारा गुटख्याचा टेम्पो येरवडा पोलिसांनी रामवाडी येथे पकडला असून टेम्पोतून पावणे चौदा लाखाचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकावर अन्नसुरखा व मानके व तंबाखूजन्य उत्पादने (प्रतिबंध) अंतर्गत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावाराम लाबुराम देवासी (वय ३९, रा. कोंढवा, मुळगाव राजस्थान) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. वाघोली व गुटख्याचे असणाऱ्या कनेक्शनबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.