किल्ले बनवा स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

विक्रम वाघमारेंच्या संकल्पनेतून स्पर्धा यशस्वी. 

वाघोली/ प्रतिनिधी

वाघोली (ता. हवेली) येथे दिवाळीनिमित्त अष्टविनायक मित्र मंडळ आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण रविवारी (दि. ३०)रोजी संपन्न. 

      किल्ले बनवा ही स्पर्धा ६ ते १६ वयोगटातील मुल आणि मुलींसाठी होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक साई संतोष सातव याने मिळविला. द्वीतीय क्रमांक अभिनव योगेश घयितडक व क्षितिज प्रवीण शेवाळे यांनी संयुक्तपणे मिळविला. तृतीय क्रमांक मोनाली वांढेकर व जानवी पठ्ठे या मुलींनी संयुक्तपणे कमी वयात छान किल्ले बनवत मिळविला. चतुर्थ क्रमांक श्रेया महेश पाटील आणि देवांश जयंत छपके यांनी संयुक्तपणे मिळविला. पाचवा क्रमांक आर्या शिवाजी सातव आणि आदित्य नवनाथ सातव यांना संयुक्तपणे देण्यात आला. स्पर्धेत वाघोली मधील सर्वोत्कृष्ट किल्ला २०२२ हे विशेष बक्षीस अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने अभिषेक कड याला रायगड किल्ला हुबेहूब प्रतिकृती बनविल्याबद्दल सन्मान चिन्ह व विशेष खलिता देऊन सन्मानित करण्यात आले.  सर्व विजेता स्पर्धकांना सन्मान चिन्ह,शिवकालीन खलिता व रोख स्वरूपात बक्षीस देत सन्मानित करण्यात आले.

       बक्षीस वितरण प्रत्येक विजेत्या स्पर्धकाच्या किल्ल्याच्या ठिकाणी समक्ष जाऊन विक्रम वाघमारे,लक्ष्मीताई प्रकाश वाघमारे,तृप्ती विक्रम वाघमारे, कल्याणी जाडा, योगेश सातव, शिवाजी सातव, प्रमोद काळे, तरणदिप सिंग, अभिषेक गायकवाड, नागेश गुरव,चेतन राऊत, पंकज काळे, गणेश वाघमारे,यश वाघमारे,सोमनाथ हराळे व अष्टविनायक मित्र मंडळातील पदाधिकारी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.