रत्नागिरी : तालुक्यातील झरेवाडी येथील श्रीकृष्ण अनंत पाटील बुवा यांच्याविरूद्ध दाखल खटल्याची पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी राहूल मनोहर चौत्रे याच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आहे. पाटीलबुवासह त्याच्या 3 साथीदारांविरूद्ध महाराष्ट्र जादुटोणाविरोधी कायद्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.

श्रीकृष्ण अनंत पाटील, प्रशांत प्रभाकर पारकर, अनिल मारुती मयेकर व संदेश धोंडू पेडणेकर यांच्याविरूद्ध हा खटला चालवण्यात येत आहे. खटल्यातील माहितीनुसार, पाटीलबुवा हा आपल्या झरेवाडी येथील मठामध्ये दैवी चमत्कार करत असल्याचा दावा करत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच पोलिसांकडून या घटनेची दखल घेण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाटीलबुवा व त्याचे अन्य 3 साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.