राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर रजत हजारो पदांसाठी पोलीस भरती करण्याची घोषणा मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार कोणत्या जिल्ह्यात किती जागा असतील आणि कोणत्या प्रवर्गाला किती जागा मिळतील याचे निकषही ठरवण्यात आले होते. एक नोव्हेंबरपासून भरती प्रक्रिया सुरु होणार होती. मात्र आता या भरती प्रक्रियेत विघ्न आल्याची बातमी समोर आली आहे. काही कारणास्तव ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहखात्याची बैठक पार पडली या बैठकीनंतर राज्यातील पोलीस भरतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. 14 हजार 956 पदे पोलीस शिपाई पदांची असणार आहेत. राज्यातील सर्वात जास्त जागा ह्या मुंबई पोलिसांत भरल्या जाणार आहेतय. 6 हजार 740 पदे मुंबई तर 720 पदे पुणे शहरात भरली जाणार आहेत. मात्र या निर्णयाला तात्पुरती स्थिगिती देण्यात आली आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांनी नाराज होऊन न जाता तयारी सुरु ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता होती. मात्र आता ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. 3 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरतीसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. यासाठी policerecruitment2022.mahait.org आणि WWW.mahapolice.gov.inया संकेतस्थळावर पोलीस भरतीसाठीची माहिती मिळणार आहे. दरम्यान अर्जदार एकाच विभागात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

याठिकाणी भरल्या जाणार जागा

मुंबई - 6740, ठाणे शहर - 521, पुणे शहर - 720, पिंपरी चिंचवड - 216, मिरा भाईंदर - 986, नागपूर शहर - 308, नवी मुंबई - 204, अमरावती शहर - 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई - 620, ठाणे ग्रामीण - 68, रायगड -272, पालघर - 211, सिंधूदुर्ग - 99, रत्नागिरी - 131, नाशिक ग्रामीण - 454, अहमदनगर - 129, धुळे - 42, कोल्हापूर - 24, पुणे ग्रामीण - 579, सातारा - 145, सोलापूर ग्रामीण - 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड - 155, परभणी - 75, हिंगोली - 21, नागपूर ग्रामीण - 132, भंडारा - 61, चंद्रपूर - 194, वर्धा - 90, गडचिरोली - 348, गोंदिया - 172, अमरावती ग्रामीण - 156, अकोला - 327, बुलढाणा - 51, यवतमाळ - 244, लोहमार्ग पुणे - 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण - 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती - 1811, अनुसूचित जमाती - 1350, विमुक्त जाती (अ) - 426, भटक्या जमाती (ब) - 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) - 292, विमुक्त मागास प्रवर्ग - 292, इतर मागास वर्ग - 2926 इडब्लूएस - 1544, खुला - 5468 जागा, एकूण - 14956