खेड : तालुक्यातील भरणे (बौध्दवाडी) अनु.जाती प्रवर्गातील मंजूर २० लाखांचा निधी शासकीय यंत्रणे ला हाताशी धरून लोकप्रतिनिधीनी परस्पर रित्या स्वताच्या फायद्या साठी खर्ची टाकून त्या जागी पूल तयार करत निधीचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर अनुसुचित जाती जमाती अन्यायाचा प्रतिबंध अधिनियामानुसार कारवाई व्हावी, अशी मागणी रिपाईचे कोकण प्रदेशचे संपर्क प्रमुख सुशांत भाई सकपाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
शासकीय धोरणानुसार अनुसुचित जातीतील वस्तीकरीता स्वतंत्र विकास निधी खर्च करणेची तरतुद आहे. असे असताना सन २०१५-२०१६ विशेष घटक साकव बांधणी कार्यक्रम योतनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण व रत्नागिरी तसेच समाज कल्याण विभाग रत्नागिरी यांना खोटी व बनावटकागदपत्र (दस्तऐवज) देऊन पुल भरणे बौध्दवाडी मधील अनुसुचित प्रवर्गातील नवबौध्द वस्तीमधीलग्रामस्थांच्या विकासासाठी सदरील योजनेतून सुमारे विस लाख रुपये इतका निधी पुलासाठी मंजुर करून घेऊन भरणे येथील नवबौध्द समाजातील ग्रामस्थांना उपयोगात नसलेल्या ठिकाणी नगरपंचायत खेडचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव सदानंद खेडेकर यांनी आपल्या स्वतःच्या व्यावसाईक फायदयासाठी व आपले राजकीय वजन वापरून शासनाची दिशाभूल व फसवणुक केली असल्याचा आरोप सकपाळ यांनी केला आहे.
दरम्यान तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक संबंधित कर्मचारी व अधिकारी यांनी व वैभव सदानंद खेडेकर यांनी संगनमताने केवळ दलितवस्तीवर अन्याय करण्याच्या उद्देशाने जाणुनबुजुन व जातीवादी मानसिकतेतुन नियोजनबध्द दलीतवस्तीचा निधी इतर ठिकाणी बेकायदेशिरपणे व नियमांना हरताळ फासून दलित वस्तीतील नवबौध्द ग्रामस्थांना विकासापासून वंचित ठेवले असल्याचे म्हटले आहेया प्रकरणी अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल व्हावा. अशी आमची प्रमुख मागणी आहे मात्र हा विषय गंभीर असून याची पूर्णता तड लावण्या साठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीने हा विषय उघड झाला असून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगा समोर हा विषय मांडला जाणार आहे तसेच गुन्हा दाखल न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हा सर चिटणीस व नगरसेवक आदेश मर्चंडे यांनी दिला आहे.
६ वर्ष लोटून देखील यंत्रणा समाजावर अन्याय करत आहे. हा अन्याय सहन आता केला जाणार नाही, जे या प्रकरनात दोषी आहेत त्यांच्या वर कारवाई होणे गरजेचे असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके यांनी सांगितलेपोलीस उप विभागिय अधिकाऱ्यांचे कारवाईचे आश्वासनभरणे बौद्धवाडी निधी प्रकरणी डिवायएस पी बोरे यांची रिपाइं च्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी भेट घेवून अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या मागणीला श्री बोरे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आलेया प्रसंगी जिल्हा संघटक विजय खेरे ,मिलींद तांबे, आर पी येलवे , तालुकाध्यक्ष संतोष कापसे , सर चिटणीस सुरेंद्र तांबे,शहर अद्यक्ष दिपेंद्र जाधव,संदीप येलवे जिल्हा युवा सर चिटणीस जितेंद्र तांबे, स्वप्नील धोत्रे, गौतम तांबे, उमेश पवार, संजय तांबे आदी उपस्थित होते.