गंगाखेड 

कोणत्याही राजकीय नेतृत्वाच्या विकासाचा पाया हा केवळ कार्यकर्ता असतो. नेत्यांच्या सुख-दुःखात कार्यकर्ता हाच सोबती आणि पाठीराखा असतो. तसेच कार्यकर्ता म्हणजे अजब रसायन असते. हे आमचा परिवार गेल्या १० वर्षापासून अनुभव घेत आहे. त्यामुळे कार्यकर्ता हिचं आमच्या परिवाराची ओळख आहे, असे गौरवोद्गार युवा उद्योजक सुनिल गुट्टे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून काढले. 

शहरातील राम-सीता सदन येथे आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप आळनुरे, प्रभारी हनुमंत मुंढे, जेष्ठ व्यापारी अनिल यानपल्लेवार, आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मिञमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, शिवाजी निरदुडे उपस्थित होते. 

पुढे बोलताना सुनिल गुट्टे म्हणाले की, पक्षीय विचार जनमानसात पोहचविण्यासाठी कार्यकर्ता परिश्रम घेत असतो. त्यामुळे जनसंपर्क वाढतो. आज शहराची झालेली अवस्था दूर करुन आपल्या स्वप्नातलं शहर करण्यासाठी आपण आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विकासाला चालना दिली पाहिजे. त्यासाठी गट, तट आणि हेवेदावे विसरुन कामाला लागा. 

आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आयोजित केलेल्या या बैठकीस माजी नगरसेवक सत्यपाल साळवे, इक्बाल चाऊस, उध्दव शिंदे, इंतेसार सिद्दीकी, खालेद शेख, संजय पारवे, सचिन नाव्हेवर, सचिन महाजन, सतिश घोबाळे, छोटू कामत, सैफ चाऊस यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.