आमदार निलेश लंके यांची राहुल झावरेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर
ढवळपुरी येथे विविध विकास कामाचे लोकार्पण
माजी आमदार नंदकुमार झावरे व्यापारी संकुलाचे उद्घघाटन संपन्न
टाकळी ढोकेश्वर | प्रतिनिधी
आमदार निलेश लंके यांच्या आमदारकिच्या काळातील काम अत्यंत चांगले आसुन कोविडच्या कामाने जगाला भुरळ घातली विकास कामे करताना अनेक अडचणी येतात मात्र त्यावर मात करून आपले काम सुरू ठेवा भविष्यकाळ अत्यंत चांगला आसुन विरोधकावर वैयक्तिक टिका टिप्पणी टाळा असा वडिलकीचा सल्ला माजी आमदार नंदकुमार झावरे यानी आमदार निलेश लंके यांना दिला
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील विविध विकास कामाचे लोकार्पण माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या अध्यक्षते खाली व आमदार निलेश लंके माजी सभापती राहुल झावरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला यावेळी विचार पीठावर राष्ट्रवादी काँग्रस चे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब तरटे किरण ठुबे कोरठण देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे वनकुटे चे सरपंच ॲड. राहुल झावरे नामदेव गावडे अजित सांगळे सुखदेव
चितळकर नगरसेवक बाळासाहेब नगरे नितीन अडसुळ डॉ . बाळासाहेब कावरे ढवळपुरी सेवा सोसायटीचे चेअरमन भागा गावडे मारुती रेपाळे परशुराम फंड यांच्या सह मान्यवर उपस्थित होते .
नंदकुमार झावरे पुढे बोलता ना म्हणाले की पारनेर तालुका हा वैचारिक पातळीवर काम करणारा तालुका आसून येथील मतदारही हुशार आहे त्याला चांगल्या वाईट गोष्टी कळतात आमदार निलेश लंके यांच्या कामाच्या माध्यमातुन पुढाऱ्या च्या राजकिय दुकानदाऱ्या बंद झाल्यामुळे ते बेताल वक्तव्य करतात त्याकडे लक्ष देऊ नका .
काळु धरण प्रकल्पाच्या जलपुजना वरून गेले दोन महिने तालुक्यात अरोप प्रत्यारोप सुरू होते त्यावर भाष्य करताना माजी आमदार नंदकुमार झावरे यानी सुजित झावरे यांचे नाव न घेता चांगलेच फटकारले ते म्हणाले की काळुधरणाची मजुरीची प्रक्रिया १९७६ सालापासून दिवंगत आमदार शंकरराव काळे साहेबा पासून सुरु झाली दिवंगत माजी आमदार बाबासाहेब ठुबे व माझ्या कार्यकालातील १० वर्ष असा आम्ही संघर्ष करून वन विभाग व सैन्यदला कडुन परवानग्या आणल्या खासदार बाळासाहेब विखेनी मोलाची मदत केली म्हणुन तो प्रकल्प उभा राहीला मंजुरी पासून ते धरणात पाणि साचे पर्यन्त तब्बल ४८ वर्ष लागली मग या धरणाच्या कामाचे श्रेय नेमक कोणाला
देयाचे जलपुजन करणार्याचा त्या वेळी जन्म ही नसेल त्यानीच पाऊस पाडावा आणि धरणे ही बांधावीत असा उपरोधीक टोला लगावला .
या वेळी आमदार निलेश लंके बोलताना म्हणाले की मी आमदारकीच्या निवडणुकिला उभे राहील्या पासूनच माजी आमदार नंदकुमार झावरे साहेबानी मला आशिर्वाद आणी विचार दिलेत त्यांच्या विचाराना व आदर्शाना समोर ठेवुन आपण काम करत आहेत तालुक्यात आदर्श जपणारे व्यक्तीमत्व म्हणुन नंदकुमार झावरे साहेबा कडे पाहिले जाते . फक्त काँग्रेस पक्षात असलेले पारनेर पंचायत समिती चे माजी सभापती राहुल भैय्या झावरे यानी राष्ट्रवादी काँगेस पक्षात आधिकृत प्रवेश करावा असे म्हणताच सभा स्थळावर टाळ्यांचा कडकडाट आणि हात वर करून लोकां नी प्रतिक्रिया दिली आम्ही दोघे मिळुन तालुक्याचा विकास करू अशी खुली ऑफरच दिली मात्र या वर माजी आमदार नंदकुमार झावरे नी कोणती ही प्रतिक्रिया दिली नाही . आमदार लंके यानी विविध विकास कामाचे लोकपर्ण झाल्या चे जाहीर केले .
सरपंच राजेश भनगडे यानी कार्य काळात राबविलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा सादर केला
संतोष चौधरी यानी सुत्रसंचालन केले तर अमोल ठाणगे यानी आभार मानले.