संगमेश्वर : सौ. वैशाली संजय रहाटे (वय ४४ , रा नावडी बाजारपेठ) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात राहत्या घरातील कपाटातील सोन्याचे सुमारे साडेसात लाखाचे दागिने चोरी झाल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. राहत्या घरात झालेल्या चोरीमुळे खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात भेट देत पोलिसांना मार्गदर्शन केले होते.
संगमेश्वर पोलिसांची पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस सचिन कामेरकर, किशोर जोयशी, आव्हाड, कांबळे, बरगाळे, शिंदे, पंदेरे यांनी तपास केला. तपासामध्ये चोरीला गेलेले दागिने घरातूनच हस्तगत केले आहेत. पोलिसांनी २४ तासाच्या आतच चोरीच्या छडा लावत दागिने हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.