संगमेश्वर :आरंभ ग्रुप तर्फे सलग दुसऱ्या वर्षी वाडा वेसराड भंडारवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ह्या शिबिरात एकूण 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा उत्साह खूप होता.
यावेळी रत्नागिरी रक्त केंद्र शासकीय रुग्णालयाची टीम उपस्थित होती त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांनी सुद्धा आपल्या गावाच आणि आरंभ ग्रुपचं अभिनंदन केलं. परंतु निरीक्षण लक्षात घेता महिलांचा सहभाग हा अत्यल्प होता. रक्तदानाविषयी आपल्या समाजामध्ये अजूनही जनजागृती नाही. महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त होते. तर पुरुषांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बरेचसे रक्तदाते रक्त दान करू शकले नाहीत.
यावेळी आरंभ ग्रुपचे कार्यकर्ते राजेश सुर्वे ,प्रसाद नागवेकर ,सचिन नागवेकर ,दर्शन नागवेकर, अक्षय भाटकर ,करण नागवेकर ,संजना पारकर, नंदकुमार नागवेकर,संजय लांगडे ,उमेश सोलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. आणि कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी खूप मेहनत घेतली.
पुढील वर्षी जनजागृती करून महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी यावे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. रक्तदानासाठी आरंभग्रूप तर्फे करण्यात आलेल्या नियोजनाचे सुद्धा रक्तदात्यांनी कौतुक केले. आणि असेच समाजभान बाळगून सामाजिक कार्य करत राहण्याचे ठरवण्यात आले.