आज दिवाळीच्या सांजवेळी"साद फाउंडेशन"बीड च्या वतीने अतिशय सामान्य माणसातील सामान्य माणूस शोधून काढून फराळ वाटप करण्यात आला .
बीडच्या विविध भागांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला शहरातील आणि ग्रामीण भागात गोर गरीबाची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला गेला ,यावेळी ग्रूप चे प्रमुख अध्यक्ष मेहर शेख , उपाध्यक्ष नारायण औटे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साधण्यात आला त्यांचे नेहमी मार्गदर्शन लाभले या उपक्रमात सहभाग सर्व मित्रांचे आभार यावेळी ,बाळू तावरे, दशरथ बहीर, अमोल झोजे,कल्याण गावडे, सुनील टुले शेख शौकत,प्रदीप आगाम , मकरंद आगाम, रवी शेंदाडे, असलम यांच्या आधीच्या सहकार्यातून हा रितसर उपक्रम पार पडला.