कन्नड तालुक्यात कार्डधारकांना १०० रुपयांत एक किलो पामतेल , एक किलो रवा , एक किलो चणाडाळ , एक किलो साखर या वस्तूंचा समावेश असलेला आनंदाचा शिधा किट तालुक्यातील ५ ९ रेशन दुकानात पोहोचलेच नाही . त्यामुळे आनंदाचा शिधा किटकडे डोळे लावून बसलेल्या हजारो गोरगरिबांच्या पदरी ऐन दिवाळीच्या सणासुदीत निराशा पडली . तालुक्यातील रेशन कार्डधारकांची संख्या . एपीएल कार्डधारक १८ हजार १७ ९ बीपीएल- ४ ९ हजार ४६७ अंत्योदय ५ हजार ९ २ कार्डधारक आहे . याबाबत कन्नड पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार हारुण शेख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की , तालुक्यातील पिशोर विभागातील गोदामात पहिला लॉट आला होतो . तो ८ ९ रेशन दुकानदारांपर्यंत पोहचला असून त्यांनी तो वितरितही केला . वेळेत काही सामान आले नसल्याने दिवाळीपूर्वी ते वितरित करू शकलो नाही . आता माल आला असून तालुक्यातील उर्वरित ५ ९ दुकानांवर माल पोहोच करण्यात येत आहे . जिल्हा पुरवठा विभागाकडून एकाच वेळी पूर्ण किट न मिळाल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी किट वितरण करताना पुरवठा विभागाची चांगलीच तारांबळ उडाली