रत्नागिरी : शहरातील कर्ला येथे प्रौढेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याचा सुमारास उघडकीस आली.

शमशाद शौकत मुकादम (५५, रा. कर्ला, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या प्रौढेचे नाव आहे. त्या घरात एकट्याच रहात होत्या सोमवारी दुपारी त्यांनी अज्ञात कारणातून राहत्या घराच्या सिलिंग फॅनला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. शहर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

शहरातील खालची आळी येथील प्रौढाने अपूर्ण बांधकामाच्या शिगेला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस स्थानकात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. जितेंद्र तुकाराम खाके (५०, रा. परुळेकर यांच्याकडे भाड्याने, खालची आळी, रत्नागिरी) ही घटना ३ वाजण्याचा घडली. मिळालेल्या माहितीनुसार मयत खाके यांना मद्यपानाचे व्यसन होते. ते गवंडी काम करीत असत गेले दोन दिवस बेपत्ता होते. मात्र त्याबद्दल शहर पोलीस स्थानकात नोंद नव्हती. खालची आळी येथील लघु उद्योग वसाहत येथील रान वाढलेल्या ठिकाणी राजेंद्र रामचंद्र खापे यांच्या घराच्या अपूर्ण बांधकामाच्या शिगेला जितेंद्र खाके यांनी नायलॉनची जाडी दोरी बांधून पायाखाली दगड ठेऊन गळफास घेतला. या प्रकरणी राजेंद्र खापे यांनी शहर पोलीस स्थानकात खबर दिली. खबर दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला असून मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया शहर पोलीस स्थानकात सायंकाळी उशिरा पर्यंत सुरु होती.