मेष: नवीन कामाची सुरूवात करू शकता. आरोग्य निरोगी राहील. सरकारी कामात लवकरच यश मिळेल. गृहस्थजीवनात सुख-शांती राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ: कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. खर्च वाढेल, आर्थिक व्यवहार करताना सावध रहा. श्री गणेशाची पूजा करा.
मिथुन: कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आरोग्य निरोगी राहील, दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.
कर्क: सकारात्मक विचारांमुळे मनात आध्यात्मिक शक्ती प्राप्त होईल. दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. बाहेर फिरायला जाऊ शकता.
सिंह: घरात सुख-शांतीचं वातावरण असेल. व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. वाद-विवाद शक्यतो टाळावे, बोलण्यावर ताबा ठेवा.
कन्या: नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल. प्रवासाचा प्लॅन आखाल. आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यात यश प्राप्त कराल.
तूळ: कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. तुमचे सर्व कार्य चांगल्याप्रकारे पूर्ण होतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा.
वृश्चिक: मोठा आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यास करुन चांगलं प्रदर्शन करतील. प्रत्येक कार्य तुम्ही आत्मविश्वासाने कराल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल.
धनु: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत फलकारक आणि भाग्य उजळविणारा आहे. यश तुमचे दार ठोठावणार आहे. घरातील कामात व्यस्त असाल.
मकर: चांगले राहील. नोकरीमध्ये प्रभाव पडेल. लांबच्या प्रवासाचे नियोजन कराल.
कुंभ: आर्थिक स्थिती बिघडू शकते. शारिरीक कष्टामुळे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल. मोठा खर्च होऊ शकतो. भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका.
मीन: विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल, पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे.