संगमेश्वर : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. असा छंद जोपासला आहे तो संगमेश्वर नावडी येथील एका तरुणीने. जवळपास 12 वर्षे रांगोळीच्या माध्यमातून तिने वेगवेगळया देवदेवता मंदिराच्या हुबेहुब प्रतिकृती साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या या प्रतिकृती अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या आहेत. तिचं नाव आहे ज्योत्स्ना भोजवे. या तरुणीने आपल्या सहकारी मैत्रिणींसह दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर नावडी येथील गणपती मंदिरात केदारनाथ मंदिराची हुबेहुब काढलेली रांगोळी सध्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

कु. ज्योत्स्ना भोजने ही मुळची गुजरात येथील आहे. तिचे कुटुंब संगमेश्वर येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहे. हे कुटुंब गेली 35 वर्षे आठवडा बाजारात मसाला विक्री करुन आपली गुजराण करत असते. ज्योत्स्ना हिला लहानपणापासून रांगोळीची आवड आहे. वयाच्या 28 व्या वर्षीही तिने रांगोळीची आवड कायम जपली आहे. 

संगमेश्वरात नावडी येथे वास्तव्यास असलेले भोजने कुटुंब गणपती मंदिर परिसराची नेहमी साफसफाई करत आहेत. गणपती मंदिरात रांगोळी काढण्याचे काम ज्योत्स्ना ही नित्यनियमाने करत असते. दिवाळी सणानिमित्त नावडी येथील श्री गणपती मंदिरात रोज रांगोळी साकारली जाते. यावेळी 23 ऑक्टोबर रोजी ज्योत्स्ना हिने आपल्या मैत्रिणींसह कु. राधा काशिराम जखवाडीया, कुमार किरण काशिराम जखवाडीया, कुमारी अमिषा वालजी जखवाडीया, नेहा विनोद खाखोडीया, तनिषा अशोक जखवाडीया यांच्या सहकार्यातून केदारनाथ मंदिराची 8 बाय 10 फुटाची रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या रांगोळीचे कौतुक वाटत आहे. मंदिरात काढलेली ही रांगोळी पाहण्यासाठी अनेकांनी गर्दीसुध्दा केली आहे. तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ज्योत्स्ना हिला गणपती प्रासादिक मंडळाचे कायम प्रोत्साहन राहिले आहे.