संगमेश्वर : दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या दिवाळ सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या गेल्या असून लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी झाल्याचे पहायला मिळते. दिपावली पर्वणी निमित्त संगमेश्वर येथील कोड असुर गावात चि. अथर्व पंकज पोवळे (वय १३ वर्षे) याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती 4x5 फूटात साकारली आहे.
अथर्वने लाल मातीतून तयार केलेल्या किल्ल्यात आरमार, बाजारपेठ, तलाव, महादरवाजा, गुराब जहाजे, प्रशिक्षण केंद्र इत्यादी साकारले आहे. सध्या हा किल्ला पाहण्यास लाहानग्यांची वर्दळ सुरू झाली आहे. त्यासाठी लहान प्रोत्साहन म्हणून आजोबा श्री. प्रमोद शंकर पीवळे, व आजी, सौ. प्रमोदिनी प्रमोद पोवळे, आई सौ. शुभांगी पंकज पोवळे, बाबा श्री पंकज प्रमोद पोवळे, काका श्री. प्रशांत प्रमोद पोवळे व काकी सौ. प्राजक्ता प्रशांत पोवळे यांचे ही मार्गदर्शन लाभले आहे.
अथर्वने साकारलेल्या किल्ल्याची सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंबे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ साळवी (सावर्डे, उखण) व्यापारी चंद्रकांत कारेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, राजेश शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अथर्वचे तोंडभरून विषेश कौतुक केले.