धुळे

Sponsored

स्वामी विवेकानंद सीनियर सेकण्डरी स्कूल बूंदी (राजस्थान)

प्रवेश प्रारंभ | लगातार 37 वर्षों से सर्वश्रेष्ठ परिणाम देने वाली ज़िले की अग्रणी संस्था | कक्षा नर्सरी से 12 वीं तक | संकाय : कला, विज्ञान, वाणिज्य, कृषि

धुळ्याच्या वाडीभोकर रोड होमगार्ड प्रक्षिक्षण केंद्राजवळ असलेल्या झोपडपट्टीतील निराधार वृध्दांना व परितक्त्या महिलांना धुळ्याच्या 'बालमित्र फाऊंडेशन' या सेवाभावी संस्थेकडून दिवाळिचा फराळ व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

बालमित्र फाऊंडेशन ही सेवाभावी संस्था गेल्या ८ वर्षांपासून धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात निरंतर गरिब गरजू व निराधार व्यक्तिंना दिवाळीत फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहे.

याआधी नगाव, कापडणे, वरखेडी, बिलाडी, वाडिभोकर, सोनगीर,मोहाडी येथे असे उपक्रम राबविण्यात आले असून ह्या व्यतिरिक्त सोनगीर,अजंग, पालघर, नाशिक, कन्नड,पिंपळनेर येथील आदिवासी व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करणे, वृक्षारोपण करणे व तसेच निस्वार्थ पणे सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना वेळोवेळी सन्मानित करण्याचे कामदेखील ही संस्था करीत आहे . संस्थेच्या सामाजिक कार्याला अजून हातभार लागल्यास संस्था भविष्यातही अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबवेल असे आश्वासन संस्थेचे संचालक सदस्य श्री. व्ही.जी.पाटील सर यांनी केले.तसेच फक्त निराधार व अत्यंत गरजू व्यक्तिंना याचा लाभ मिळावा यासाठी आमचा प्रयत्न कायम असेल अशी भावना संसथेचे उपाध्यक्ष- श्री.यशपाल सोनवणे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा प्रभाताई परदेशी यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामे केल्याबद्दल सौ.शारदा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यास सहसचिव श्री.मुकेश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर, आशाताई पाटील,रूपचंद पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले .