खेड : येथील राहणारी जसनाईक जिचे पती परदेशी राहाण्याकरिता होते. दोघांचा सुखाचा संसार होता, दोन मुले झाली आणि पतीला दुर्बुद्धी सुचली. काही कारणास्तव आपल्या पत्नीपासून वेगळा होऊन दुसरे लग्नही केले. आपल्या दोन लेकरांसह पत्नीला वाऱ्यावर सोडले. या पत्नीने शेवटी कोर्टाचा दरवाजा ठोठावला, परंतु कोर्टात मला दहा हजार रुपये पगार असल्याचे पतीने सांगितले.
खेड येथील कोर्टाने केवळ रू. पाच हजार रूपये पोटगी दिली, म्हणून निराधार महिलेने जिल्हा न्यायालय खेड येथे अपील केले. जिल्हा न्यायालय खेड येथे देखील जिल्हा न्यायाधीश आवटे यांनी पाच हजार रुपये पोटगी ठेवली, म्हणून व्यतित होऊन निराधार महिलेने ॲड. श्रेयस सुधीर बुटाला यांच्यामार्फत उच्च न्यायालय मुंबई येथे रिविजन केले. या रिविजनमध्ये ॲड. श्रेयस सुधीर बुटाला यांनी अनेक मुद्दे मांडले. नवरा परदेशी होता. त्याला दीड लाख रुपये पगार होता. त्यामुळे त्याने दिलेला दहा हजारांचा दाखला हा चुकीचा व खोटा आहे. या स्टेजला तो ग्राह्य धरता येणार नाही तसेच अनेक उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले दिले. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टीस प्रकाश नाईक यांनी ॲड. श्रेयस सुधीर बुटाला यांचं रिविजनवजा रिट मान्य करून सदर निराधार महिलेला दरमहा मुलांसह २६,००० रुपये पोटगी देण्याचा आदेश केला.