मुरुड तालुक्यातील आगरदांडा बंदर ठिकाणी १६एकर जागेवर २००७ पासुन आगरदांडा -दिघी पोर्ट कंपनी सुरू करण्यात आली होती.यांचा ठेका कलंत्री यांना देण्यात आलं होतं.ही कंपनी तोट्यात जात असल्याने कलंत्री यांनी या कंपनी मधुन आपली माघार घेतली. त्यानंतर अदानी कंपनीला ठेका देण्यात आला.परंतु अदानी कंपनीने ही आगरदांडा या ठिकाणी काम सुरू न केल्याने तरुणांनी मध्ये निराशा येऊ लागली ही कंपनी पुन्हा वेगाने कशी सुरू कशी होईल तरुणांना रोजगार कसा मिळेल तरुण युवक हा देशाचा कणा आहे.तरुणांचा विकास झाला की हा देशाचा विकास असे प्रतिपादन मंगेशभाई दांडेकर यांनी मुरुड शहरातील शोअर लाईन हाॅटेल या ठिकाणी सर्व पक्षीय बैठीकीत आपले मत व्यक्त केले. 

   यावेळी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष 

मंगेशभाई दांडेकर, शिवसेना तालुका प्रमुख नौशाद दळवी, शेकाप जिल्हा उपचिटणीस -मनोज भगत, तालुका चिटणीस - अजित कासार,आय काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष - सुभाष महाडिक, शिवसेना शहर प्रमुख - आदेश दांडेकर,माजी नगरसेवक - प्रमोद भायदे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष - मृणाल खोत, चिटणीस - विजय पैर, पंचायत समिती माजी उपसभापती - चंद्रकांत मोहिते ,माजी नगरसेवक - अविनाश दांडेकर,आय काॅग्रेसचे -नाना गुरव आदिंसह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष- मंगेशभाई पुढे म्हणाले की आगरदांडा या ठिकाणी कंपनी आल्याने पंचक्रोशी भागातील अनेकांनी कर्ज काढून नविन गाड्या घेण्यात आल्या. जेणेकरून या ठिकाणी आपल्या रोजगार मिळेल.परंतु तरुणांच्या पदरी निराशाच आली.या कंपनीचं २०१२ पासुन बंद पडलं ते आज पर्यंत सुरू झालं नाही.कंपनी सुरू करण्याकरिता सर्व पक्षांनी एकत्र येणे जरुरी आहे.तरच आपल्या तरुणांना रोजगार मिळुन शकतो असे मत यावेळी मंगेशभाई दांडेकर यांनी केले.

 मुरुड तालुका हा शांत तालुका आहे त्यामुळे यांचा फायदा या ठेकेदारानी घेतला आहे.तरी तरुणांना न्याय द्याचा असेल तर आपण एकत्र येणं जरुरी आहे असे मत आय काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष -सुभाष महाडिक यांनी केले. 

मुरुड तालुक्यातील मुले मुली चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतलेले आसुन या कंपनीत आपल्या मुलांना नोकरी उपलब्ध होत नाही. तरुणांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षीय मिळुन एक कृती समिती स्थापन करावी आणि या समिती मार्फत अदानी कंपनीच्या सीईओ भेटुन तरुणांना कश्या नोक-या उपलब्ध होतील असे मत शिवसेना मुरुड तालुका प्रमुख -नौशाद दळवी यांनी मत व्यक्त केले.

यावेळी शेकाप पक्षांचे जिल्हा उपचिटणीस -मनोज भगत, अजित कासार,आदेश दांडेकर, प्रमोदजी भायदे यांनी आपले मत या ठिकाणी मांडुन तालुक्यातील तरुणांना कश्या नोक-या उपलब्ध होतील या संदर्भात मत व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला अध्यक्ष - मृणाल खोत यांनी आलेल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.