कन्नड़ तालुक्यात प्रचंड अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून. शेतीपिकाचे सरसकट पंचनामे करून शासनाची मदत तात्काळ मिळावी यासाठी अतिवृष्टी भागाची पाहणी दौरा करून पीक नुकसानीची पाहणी करावी. यासाठी कन्नडचे मा.आमदार नितीन पाटील यांनी विशेष प्रयत्न करून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकड़े नुकसानीची पाहणी करून कन्नड़ तालुका दौरा करण्याचा आग्रह धरला .त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथून पीक पाहणी करून पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहे. तसेच नेवपुर करजखेड नागापूर उबरखेड सायगाव्हण वडगाव नागद, परिसरातील शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली तसेच नागद जिल्हा परिषद सर्कल मधील सायगाव्हण . वडगाव नागद येथील शेती नुकसानीची पाहणी करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी आमदार नितीन पाटील, भरत राजपुत डॉ. मनोज राठोड, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख केतन काजे,पिशोर जिल्हा परिषद सर्कलचे सरपंच पांडुरंग पाटील घुगे, सुरेश डोळस मनोज देशमुख सुभाष दादा महाजन.नंदु शे. पंचायत समिती सदस्य गप्पु दादा राठोड.भोला भाऊ महाजन.बबलु पाटील.राजधर अहिरे.नामदेव भाऊ गोठवाळ .महाविर जैन यांच्यासह परिसरातील शेतकरी मंडळी,महसूल अधिकारी ,कृषि विभागाचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होती.