पाथरी:-अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य शिधापत्रिका धारकांची दीवाळी गोड होण्याऐवजी कडु होण्याचे चिन्ह स्पष्ट झाले आहे.दीवाळीची सुरुवात शुक्रवार रोजी वसुबारस ने झाली असुन आजपर्यंत दीवाळीची कीट अद्यापही लाभार्थ्यांना भेटलेलीच नाही.म्हणुणच आत्ता लाभार्थ्यांना कीट मिळते की नाही हे पाहणं औचित्यचे आहे.
दीवाळीनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतीरीक्त रेशनच्या वस्तुंचे कीट(पॅकेज)केवळ शंभर रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्या कीट मध्ये रवा,चणाडाळ,साखर प्रत्येकी एक कीलो आणी एक लीटर पामतेल १०० रुपयांत देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.महागाईच्या काळात कमी कीमतीत वस्तु मिळणाऱ्या असल्याने पात्र लाभार्थांचे डोळे स्वस्त धान्य दुकानाकडे लागले आहेत.या कीटच्या पुरवठ्यासाठी पुरवठादार नेमण्यात आले असुन मात्र वेळेत कीट मधील धान्य दुकानापर्यंत पोहचवण्यात अपयश आल्याचे दीसुन येत आहे.