कन्नड तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विजय जनार्दन भंडारे याने एक एकर जमिनीचा तक्रारी फेर मंजूर करून ऑर्डर काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले . हा प्रकार तहसील कार्यालयाच्या बाहेर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडला . तालुक्यातील तक्रारदाराच्या बहिणीच्या नावे असलेली एक एकर जमिनीचा तक्रारी फेर मंजूर करून ऑर्डर काढण्यासाठी कनिष्ठ लिपिक विजय जनार्दन भंडारे यांनी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती . मात्र , तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती . यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात चार वाजेच्या सुमारास लिपिक विजय भंडारे याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले . लावत पोलिस अधीक्षक डॉ . राहुल खाडे , अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे , पोलिस उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक दिलीप साबळे , पोलिस नाईक भीमराज जिवडे , दिगंबर पाठक , चालक पोलिस अंमलदार चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली