संगमेश्वर : देवरूख नजीकच्या मुरादपूर गावचे तरूण तडफदार सरपंच मंगेश बांडागळे यांनी सामाजिक बांधीलकी जपत गावातील तब्बल २५ गरिब कुटुंबांना दिवाळीची भेट देवून त्यांची दिवाळी गोड केली आहे. सरपंच मंगेश बांडागळे यांनी दिलेल्या दिवाळीच्या भेटीने ही कुटुंबे अक्षरशः भारावून गेली आहेत. 

या कुटुंबांना सरपंच मंगेश बांडागळे यांनी दिवाळीनिमित्त मिठाई, सुगंधी उटणे, साबण व आर्थिक मदत केली आहे. सरपंच मंगेश बांडागळे यांनी दिलेल्या दिवाळीच्या या भेटीने ही कुटुंबे अक्षरशः भारावून गेली आहेत. त्यांनी सरपंच मंगेश बांडागळे यांचे आभार मानले आहेत. मंगेश बांडागळे यांनी सरपंचपद स्विकारल्यानंतर चिपळुण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासकामांचा धडाका लावत आपल्या कामाची एकप्रकारे चुणूक दाखवून दिली आहे. सरपंचपद भुषवीत असतानाच मंगेश बांडागळे यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेवून गावात विकासकामे करण्यावर भर दिला आहे. 

सरपंच मंगेश बांडागळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी गावात विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखाने ठराव केला होता. सरपंच मंगेश बांडागळे हे गोरगरीबांना सढळ हस्ते मदतीचा हात देत असतात. ते सामाजिक कार्यातदेखील नेहमी अग्रेसर असतात. सामाजिक कार्याची त्यांना आवड असून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. यापुर्वी त्यांनी मुरादपूर शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. तसेच त्यांनी निवेखुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व आशा सेविकांना मोफत छत्र्या व लेखन साहित्याचे वाटपही केले आहे.

आता त्यांनी गावातील २५ गरिब कुटुंबांना दिवाळीची भेट दिली आहे. ही भेट देताना मंगेश बांडागळे यांच्यासोबत उपसरपंच परशुराम चोगले, माजी सरपंच अनिल बांडागळे, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र बांडागळे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष नितीन बांडागळे, शाहीर दिनेश साबळे, संजय केळस्कर आदिंसह ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांनी सरपंच मंगेश बांडागळे यांनी तब्बल २५ गरिब कुटुंबांना दिवाळीची भेट दिल्याबद्दल कौतुक केले आहे. सामाजिक बांधीलकी जपत आपण गोरगरीबांना मदत करत असतो. तसेच यापुढेही मदत करत राहू, असे सरपंच मंगेश बांडागळे यांनी सांगितले.