बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झालेला आहे.विशेष म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये रायमोह कृषी मंडळामध्ये ढगफुटी झाल्याकारणाने परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला, त्यामध्ये नदी-नाले एक झाले यापुरामध्ये मनुष्य हानी ही झाली,तीन जणांचा मृत्यूही झाला अशी परिस्थिती असताना हवामान खात्याने खूप कमी पावसाची नोंद केलेली आहे. प्रत्यक्षात पाहता पाऊस अति प्रमाणात झालेला असून सुद्धा हवामान खात्याने गलत नोंदणी करून डोक्यावर पडल्याप्रमाणे अतिशय कमी पाऊस झाल्याची नोंद केलेली आहे ही तात्काळ सुधारून हवामान खात्याने स्वतःची यंत्रणा दुरुस्त करून योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा नुकसान भरपाई कशी देता येईल यावरती शासनाने विचार करायला हवा परंतु हवामान खात्याने जाणून-बुजून झालेल्या अति पावसाची नोंद न करता कमी प्रमाणात पावसाची नोंद करून शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार शिरूर तालुक्याच्या हवामान खात्याकडून झालेला आहे त्यामुळे स्वतःची यंत्रणा सुधारून जे सत्य आहे त्याचाच अहवाल शासनाकडे दाखल करायला हवा असे स्पष्ट मत डॉ जितीनदादा वंजारे यांनी व्यक्त केले.हवामान खात्याची यंत्रणा बंद पडलेली आहे की काय?हवामान खाते डोक्यावर पडलेला आहे की काय? हवामान खात्याने शेतकऱ्यावरती सूड घेण्याची भूमिका साकारलेली आहे की काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात घेता हवामान खातं गलत आकडेवारी देत असल्याची बाब लक्षात येत असून ज्या कृषी मंडळामध्ये नदी नाले एक झालेले असताना,शेतकऱ्याची पोरं नदीमध्ये वाहून जात असताना, नदीचे पाणी पात्रात न बसता शेतामध्ये घुसलेल असताना अतोनात नुकसान झालेले असताना हवामान खातं कमी पाऊस झाल्याची नोंद जर देत असेल तर हा शेतकऱ्यांवर अन्याय असून याच्या विरोधात बंड पुकारण्यात येईल असा शब्द शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते माननीय सम्राट डॉ.जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला.

हवामान खात्याने आपली यंत्रणा सदोष असल्यास ती तात्काळ दुरुस्त करून शेतकऱ्यावरील होत असलेला अन्याय दूर करावा कारण आसमानी संकट बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आले आहे, सर्व पिके वाया गेलेले आहेत कापूस, तूर, सोयाबीन, उडीद,मूग,बाजरी व ईतर सर्व खरिपाची पिके वाया गेलेली असून शेतामध्ये वाया गेलेल्या पिकाकडे पाहून शेतकरी हवालदिल झालाय वेळप्रसंगी शेतकरी आत्महत्या करत आहे त्यामध्ये हवामान खात्याने चुकीच्या रीडिंग देऊन पाऊस कमी झाल्याची नोंद दिल्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई विमा मिळणार नाही. यासाठी हवामान खात्याला कळकळीची विनंती आहे की तुमची बंद पडलेली यंत्रणा तात्काळ सुधारा आणि योग्य आणि जे सत्य आहे त्या रीडिंग समोर घेऊन शिरूर तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील हवामान खात्याचा आणि झालेल्या पावसाचा अचूक आकडा देऊन शेतकऱ्यांवर मेहरबानी करावी असे विनंती शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिली