रत्नागिरी : शहरालगतच्या साई भूनिनगर येथे एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आत्महत्या की खून? अशी चर्चा शहर परिसरात सुरू आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

सविस्तर वृत्त, शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास साई भुमी नगर येथे एका बिल्डिंगमध्ये मिऱ्या अलावा येथील एका तरुणाचा मृतदेह आढळला. हा तरुण सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. तातडीने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसाना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शव विश्चेदनासाठी नेण्यात आला आहे. पोलिस आजूबाजूच्या परिसरात कसून चौकशी घेत आहेत.

 मात्र त्याच्याबरोबर एक मुलगी होती असे आजूबाजूच्या लोकांकडून चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून मात्र दोन मुलींची चौकशी सुरू आहे. हा तरुण सकाळी एका कंपनीत कामाला जाता अनेकांनी पाहिले होते. दरम्यान या युवकाचा खून झाला की आत्महत्या याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.