रत्नागिरी  : महाराष्ट्र शासन गृह विभागाने आज शासन आदेश काढला आहे. यामध्ये रत्नागिरीचे नवीन पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्याचे पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांची बदली करण्यात आली आहे. डॉ गर्ग यांना अद्याप पुढील नियुक्ती देण्यात आलेली नाही.