औरंगाबाद : लूटमार , चोरीत गेलेला ऐवज आता काही परत मिळणार नाही , असे वाटत होते . परंतु , पोलिसांनी तपास करून चोरांना केवळ अटक न करता त्यांच्याकडून चोरीचा ऐवज परत मिळवून आम्हाला दिला . ही आमच्यासाठी दिवाळीची भेटच आहे , असे सांगताना मंगळवारी अनेक तक्रारदारांना भावना अनावर झाल्या . जिल्हा पोलिसांनी गेल्या ६ महिन्यांतील गुन्ह्यातील ऐवज परत देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात या भावना व्यक्त केल्या . एकूण ३४ लाख ८ ९ हजार ९ ६६ रुपयांचा ऐवज दिला . शहरासह ग्रामीण भागात चोरी , लूटमार , दरोड्याच्या घटनांत वाढ झाली . पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी अशा गुन्ह्यांचा तपास करून तातडीने मुद्देमाल परत देण्याच्या सूचना केल्या होत्या . त्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कैलास शिल्प सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या वेळी पोलिस अधीक्षक कलवानिया यांच्यासह अपर अधीक्षक डॉ . पवन बनसोड , उपविभागीय अधिकारी डॉ . विशाल नेहुल , जयदत्त भवर , मुकुंद आघाव , विजयकुमार मराठे , प्रकाश बेले यांची उपस्थिती होती . सहायक निरीक्षक भरत मोरे यांनी सूत्रसंचालन केलेघायाळ यांचे १७ लाख परत अजिंठा येथील सुनीता कुंभार यांचे मंगळसूत्र चोरीला गेले होते . मंगळवारच्या कार्यक्रमात त्यांना अधीक्षकांनी परत करताच त्यांना अश्रू अनावर झाले . ऐन दिवाळीच्या अगोदर मौल्यवान दागिने परत मिळाल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार मानले . शिवाय संत एकनाथ कारखाना येथे ऊस पोहोच न करता बनावट कागदपत्रे दाखल करून जास्त बिल उचलून सचिन घायाळ यांची २० लाखांची फसवणूक झाली होती . त्यापैकी १७ लाख ८३ हजार रुपये त्यांना परत दिले . शिवाय सिल्लोडच्या मोहसीन खालेद देशमुख यांना पिकअप व्हॅन , दहा दुचाकी आणि हरवलेले २७ मोबाइलही मूळ मालकांना परत दिले