पुणे- अहमदनगर व शिक्रापुर चाकण रोडवर अवजड वाहनाच्या वाहतुकीवर बंदी

  शिक्रापुर: पुणे - नगर महामार्गावर २० कि.मी. तसेच शिक्रापुर - चाकण मार्गावरील ० ९ कि.मी. भागात मोठया प्रमाणात रोडलगत गोडावुन , हायस्कुल , कॉलेज , मंगल कार्यालय , हॉस्पीटल , तसेच एम . आय . डी . सी . क्षेत्र असुन सदर भागात ठिकठिकाणी रोड कॉसिंग आहेत . पुणे नगर रोड हा कोरेगांव भिमा , सणसवाडी , शिक्रापुर कोंढापुरी या गावांचे हददीतुन जात असून , त्याठिकाणी चाकण व रांजणगांव एम.आय.डी.सी. क्षेत्र असल्याने तेथून मोठया प्रमाणात अवजड वाहने ये- करत असतात . त्याचप्रमाणे स्कुल बसेस विदयार्थ्याची मोठया प्रमाणावर वर्दळ होत असते . तसेच रांजणगांव व चाकण एम . आय.डी.सी येथे जाणारे कर्मचारी यांच्या बसेस व खाजगी वाहनांची मोठया प्रमाणवर ये - जा होत असते . त्यामुळे सदर भागात अवजड वाहनांमुळे नेहमी वाहतुक कोंडी होत असल्याने अपघात होत असतात . त्यामुळे शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे नगर रोडवर शिक्रापूर चाकण चौकात नेहमी वाहतुक कोंडी होवुन नागरीकांची गैरसोय होते तसेच अपघात झाल्यास कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असतो . त्यामुळे उपाय योजना म्हणून या मार्गावर अवजड वाहनांची वाहतुक काही काळ बंद करण्याची बाब पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे .

 वाहतुक कोंडीच्या वस्तुस्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना खात्री झालेली आहे . त्यामुळे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे हद्दीत पुणे- नगर रोड व शिक्रापुर चाकण रोडवर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ०७.०० वा . ते ११.०० वा . आणि सायंकाळी ४.०० ते रात्री ०८.०० वा . पर्यतच्या कालावधीत अवजड वाहनांची वाहतुक प्रायोगिक तत्वावर बंद ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे . सदरची कार्यवाही दि. २१ऑक्टोबर ते दि.०४नोव्हेंपर्यंत प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे . याबाबत काही सूचना हरकती असल्यास या कार्यालयाकडे अधिसूचना प्रसिध्द झाले पासून १५ दिवसापर्यंत पाठवाव्यात . त्यानंतरच्या प्राप्त झालेल्या हरकतीचा विचार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.