रत्नागिरी: आविष्कार संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेत सर्वांचे कौतुक केले.
आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळेतील विद्यार्थ्यांनी दीपावलीनिमित्त कलात्मक वस्तू बनवल्या आहेत. यामध्ये शुभेच्छापत्रे, मेणबत्त्या, पिशव्या यांसह विविध शोभिवंत वस्तूंचा समावेश आहे. स्वा. सावरकर नाट्यगृहात येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. उद्घाटनावेळी जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, अधिकारी राहुल देसाई, शेखर सावंत, आविष्कार संस्थेचे अध्यक्ष सी. ए. बिपीन शाह, उपाध्यक्ष दीप्ती भाटकर, सचिव संपदा जोशी, खजिनदार डॉ. शरद प्रभुदेसाई, कार्यशाळा समिती अध्यक्ष नितीन कानविंदे, सदस्य पद्मजा बापट, कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक सचिन वायंगणकर, सविता कामत विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका वैशाली जोशी, प्रतिभा प्रभुदेसाई, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.