माझा संघर्ष पोर्टल न्यूज

जिंतूर (दि-१९/१०)

राज्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, परभणी जिल्ह्यासह जिंतूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून सरसगट आर्थिक मदत करा व पिक विम्याच्या जाचक अटी रद्द करून सर्वांना पिक विम्याचा लाभ द्यावा या आणि ईतर अन्य मागण्यासाठी आज (दि-१९) रोजी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन करून स्थानिक प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

जिंतूर तालुक्यात परतीच्या संततधार पावसाने सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण तालुक्यात हाहाकर झाला होता. त्यामुळे अतिवृष्टीमुळे हातातोंडाला आलेला पिकाचा घास पावसाने हिसकावुन घेतल्यामुळे शेतकऱ्याला अक्षरशः देशोधडीस लावले आहे. अतिवृष्टीमुळे संपुर्ण पिकाचे मोठे नुकसान झाले.त्यामुळे शेतकरी ऐन दिपावलीच्या सणात आर्थिक संकटात सापडला आहे म्हणून शासनाने हेक्टरी 50 हजार रूपये अनुदान देण्यात येवून शेतकऱ्याला आर्थीक मदत देण्यात यावी पिक विम्याच्या जाचक अटी रद्द करून विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरसगट पिक विमा मंजूर करावा अन्य मागण्यासाठी जिंतूर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात तर 15 दिवसात शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे रास्ता रोको आंदोलनात तालुका प्रमुख राम शर्मा यांच्यासह बंडू लांडगे,गंगाप्रसाद घुगे,युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश संगेकर,अरविंद कटारे,भारत पवार,हनुमंत बोबडे,गोविंद खंडागळे, संदीप अंभोरे,अशोक शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाचे तालुका अध्यक्ष माजी सैनिक बालाजी शिंदे,अभिजित देशमुख हे सहभागी झाले होते.