रत्नागिरी : आठवडा बाजार ते काँग्रेस भवन कार्यालय येथील रस्ता दुर्दशा संदर्भात अनेकदा काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले तरीही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे सबंधित रस्ता ठेकेदार, जमीनदार, रनप प्रशासकीय अभियंता व रस्ता पूर्णत्वाचा दाखला देणारे नगरपरीषद अधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. त्यासाठी सदर रस्त्यावर बसून निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनावेळी डांबर विरहित रस्ते, आधी मूलभूत सुविधा सुधारा, मग उद्योगाची भाषा करा, खड्डे विरहित रस्ते रत्नागिरीकराची गरज, केंद्रात व राज्यात सत्ता भाजपची, आपली रत्नागिरी सुंदर रत्नागिरी असे फलक हातात घेऊन ठेकेदार वर गुन्हा दाखल करा अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसने सदर निषेध करण्यासाठी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

यावेळी प्रदेश महिला सरचिटणीस रूपाली सावंत,मिडिया विभाग प्रदेश सचिव सुस्मीता सुर्वे, मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महीला तालुकाध्यक्ष रिझवान शेख, तेजश्री गोतंम, सीमा राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुमार शेट्ये, बशीर मुर्तुजा, निलेश भोसले, शमीम नाईक, आंबेरकर, मिल्के, फर्झाना मस्तान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.