कन्नड तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संजय वारकड , तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी गावपातळीवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करावी म्हणून जनजागृती केली होती , मात्र तरीही ८ , ३३४ शेतकऱ्यांनी केवायसी न केल्याने ते लाभापासून वंचित राहणार आहेत . तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी ४५४१७ शेतकरी पात्र ठरले होते . या सर्व शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन तलाठी , ग्रामसेवक , कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून तसेच गावागावांत दवंडी देऊन प्रसार माध्यमातून बातम्या प्रकाशित करून तर सोशल मीडियावरुनसुद्धा करण्यात आले होते . यात ३७०८३ शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत प्रतिसाद देऊन आपले केवायसी पूर्ण करून घेतले . तालुक्यात अजूनही १८ टक्के म्हणजे ८३३४ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण न केल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांना किसान सन्मान योजनेच्या लाभापासून चे 66 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतः आधार कार्ड घेऊन गावातील महा - ई सेवा केंद्र अथवा स्वतः मोबाईलवरून केवायसी करावयाचे आहे . यावेळी लाभार्थीना ओटीपी येतो . अजूनही ई - केवायसी प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी तत्काळ करून घ्यावे , कोणीही योजनेपासून वंचित राहणार नाही . - संजय वारकड , तहसीलदार , कन्नड वंचित राहावे लागणार आहे . सदर योजना अल्पभूधारक कमी उत्पन्न आसलेल्या शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून केंद्र सरकार दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट लाभार्थीच्या खात्यावर जमा केले जातात . पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून अपूर्ण ई के वायसी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागाने वेळोवेळी आवाहन करून ई के वायसी पूर्ण करण्याचे सूचित केले होते . त्यात काही शेतकऱ्यांनी अजूनही ते केले नाही . अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली ई - केवायसी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे