*आडगाव फाटा ते जिंतूर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी*जनशक्ती शेतकरी संघटनेचे अभियंता यांना निवेदन*

जिंतूर प्रतिनिधी

जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा ते जिंतूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्या कारनाने तात्काळ दुरुस्त करण्याच्या मागणीचे निवेदन जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने संबधीत विभागाचे अभियंता यांना सोमवार दिं.17 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.

आडगाव फाटा ते जिंतूर पर्यंतच्या रस्ताची मागील काहि दिवसा पासुन अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्या कारनाने या रस्तावरुन वाहने चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तरी या कडे शासनस्तरावरुन दुर्लक्ष होताना दिसत असल्याने वाहन धारकासह प्रवाशांना त्रास सहन करत प्रवास करावा लागत आहे.या मुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा मनुन जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने जनहिताचा प्रश्न मार्गी लावुन प्रवासी व वाहन धारकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी संबधीत विभागातील अभियंता रफिक मोगल यांना जनशक्ती शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शितलताई कदम यांनी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन दिले या वेळी उपजिल्हाध्यक्ष लिंबाजीराव अंभुरे व तालुकाध्यक्ष सतिश हरहरे यांची उपस्थिती होती.