लांजा : उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजा तालुक्यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा हा करिष्मा असल्याचे मत विजयानंतर आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायतींच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे वर्चस्व स्थापन करून कोकण हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध केले आहे. लांजा तालुक्यामध्ये १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शिवसेनचा उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने भगवा फडकवला आहे. राजापूर-लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघातील दैदीप्यमान व अपेक्षित विजयानंतर येथील बहुतांशी विजयी सदस्यांनी आमदार डॉ. राजन साळवी यांच्या माध्यमातून गावागावात झालेली विकासकामे व शिवसैनिकांची अपार मेहनत यामुळे आपण हा विजय साकार होवू शकल्याचे सांगितले.