रत्नागिरी : तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या शिरगाव ग्रामपंचायत प्रतिष्ठेची करण्यात आली हाेती. याठिकाणी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी यांनी ताकद लावली हाेती. त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे केले हाेते. याठिकाणी सरपंच पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली.
शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली. सरपंच पदावर महाविकास आघाडीच्या फरीदा रज्जाक काझी या ३०० मतांनी विजयी झाल्या. मात्र १७ पैकी १५ जागा जिंकत शिंदे गटाने आपले वर्चस्व राखले. शेवटच्या फेरी पर्यंत निवडणूक रंगतदार झाली. सरपंच पदासाठी कांटे की टक्कर झाली. अखेर फरीदा काझी यांनी सरपंच पदावर विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार सौ. मोरे यांनी या निवडणुकीत सरपंच पदासाठी १७०० मते घेतली. फरीदा काझी यांनी २ हजार ६०, कुमठेकर १ हजार ७५० मते घेतली.