औरंगाबाद :१ ९ कोटिंसाठी हर्सुल रोडचे भूसंपादन रखडले गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार चिन्हाच्या लढाईत गुंग आहे . त्यामुळे विकास कामांचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे . कारण पावसाळ्यापूर्वी हर्सुलच्या रस्त्याचे भूसंपादन करण्याचे नियोजन होते . त्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तयारी केली होती . मात्र सरकारकडून १ ९ कोटी ७२ लाखांचा निधी न मिळाल्याने अद्याप भूसंपादन झाले नसल्याने हजारो नागरिकांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे . हर्मूल रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात . चारशे मीटर लांब रस्ता तयार करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे . पावसाळ्यापूर्वीच येथील मालमत्ता पाडून रस्ता तयार करण्याचे नियोजन होते . नवीन रस्ता तीस मीटर रुंदीचा असेल . मात्र , भूसंपादनासाठी निधीच नसल्याचे हे काम थंड बस्त्यात आहे