पाटोदा (प्रतिनिधी) दिनांक १५ येथिल जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला व विज्ञान महाविद्यालय, पाटोदा येथे ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन 'म्हणून मोठ्या उत्साहात.साजरा करण्यात आला.या कार्यक्रमांचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे.प्राचार्य डॉ. विश्वास कदम , तर प्रमुख पाहूणे म्हणून मा. श्री रणवीर राजे ( काका) पंडित, एचडीएफसी. बँकेचे मा.श्री.चंद्रकांत चव्हाण व स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य मा.श्री.दिलीपराव जाधव यांची व्यासपीठावरउपस्थिती होती. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते माजी.राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व त्यांना अभिवादन करण्यातआले.या कार्यक्रमात चे प्रस्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा.श्रीमती ज्योती रकटे यांनी केले. प्रास्ताविक करताना त्या म्हणाल्या की 'एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते.म्हणून लहानपणीच वाचनाची गोडी लागली की, आपोआप काही गुण आपल्या अंगी येऊ लागतात. त्यामुळे ग्रंथालयाच्या वतीने वाचनाची सवय लागावी या हेतूने 'सात तास वाचन' उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. तेव्हा रोज एक तरी पान वाचत चला हा संदेश या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न केला. ‘स्वदेशे पूज्यते राजा । विद्वान सर्वत्र पुज्यते ।।'

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

असे सुभाषित आपण नेहमी ऐकतो कारण मानवाच्या ठाई असणारे ज्ञान हीच त्याची खरी ओळख आहे. अशा ज्ञानी माणसाचा प्रभाव सहज जनमनावर पडून तो सर्वांसाठी आदराचे स्थान ठरतो. वाचनाने मिळवलेले ज्ञान बुद्धीची मशागत करून, सकारात्मक विचारांना चालना देते.त्यामुळे युवकांना वाचनाचा छंद लागावा म्हणुन अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री रणवीर राजे पंडित यांनी माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे कार्य व विचार आजच्या युवकासाठी प्रेरणादायी आहोत.हे सांगुन त्यांचे भारत देशाला महासत्ता करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.अशी अपेक्षा व्यक्त केली.शेवठी अध्यक्षीय समारोप करताना प्राचीर्य डॉ.विश्वास कदम म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आम्ही ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले.आहेत.लवकरच रात्रीची अभ्यासिका ही सुरू करत आहोत.तेव्हा या भागातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे त्यानी विद्यार्थ्यांना अवाहन केले.या कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.बंडू लोकांना खंडे यांनी केले.तर आभार प्रा.डॉ.शौकत सय्यद यांनी मानले या प्रसंगी सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.