केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता एकात्मता वाढविण्यात येईल असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले,

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण ठेवत असताना येणाऱ्या काळात भारताला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते