शिरुर: शिवराय,फुले,शाहु,आंबेडकर चळवळीमध्ये प्रामाणिकपणे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, आदिवासी व भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे नेते अ‍ॅड डॉ.अरूण जाधव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सणसवाडी येथे आले असता. त्यांचा संघर्ष फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हॉटेल जोगेश्वरी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी छञपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली प्रतिमा त्यांना सप्रेम भेट म्हणुन देण्यात आली.

या भेटी दरम्यान अरुण जाधव यांनी कार्यकर्ता कसा घडतो..?या बद्दल वेगवेगळी उदाहारणे देऊन उपस्थित कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक बाळासाहेब गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते पञकार रिजवान बागवान, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते शितलकुमार गाजरे पाटील, संघर्ष सेवाभावी संस्थेचे सचिव माऊली गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापु निकुंभ, धनंजय कावरे, पंजाबराव फुलमाळी, सागर भोई आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.