वाघोली तालुका हवेली येथील कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाला दुर्गंधीला कंटाळून गोरे वस्ती परिसरातील नागरिकांनी कचरा गाड्या आडवत आंदोलन केले.
कचरा डेपोवर गाड्या येऊ नये यासाठी जे सी बी ने रस्ता ही खोदण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत आमदार अशोक पवार यांना माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी तातडीने कचरा डेपोची पाहणी करून नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावर लवकरात लवकर मार्ग काढला जाईल असे आश्वासन देखील आमदारांनी येथील नागरिकांना दिले.
वाघोलीतील गोरे वस्ती परिसरात पूर्वी पासून कचरा डेपो आहे. येथेच वाघोलीतील कचरा टाकला जातो. त्या कचऱ्याचा ढीग साचला आहे.
पावसाने तो कुजत असल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे. या कचऱ्याच्या त्रासामुळे गोरे वस्ती परिसरातील नागरिकांना जाणे येणे व राहणे मुश्किल झाले आहे.
यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी डेपो जवळ आंदोलन करीत कचरा टाकू देणार नाही अशी भूमिका घेतली.
आलेल्या कचऱ्याच्या गाड्याही त्यांनी रोखून धरल्या. गाड्या येऊ नये यासाठी रस्ताही खोदला.
या कचऱ्याचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. हा कचरा डेपो अनधिकृत असून तेथून तो कचरा उचलावा व येथे कचरा टाकू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली.
हा डेपो बंद झाला नाही तर कचरा वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात आणून टाकला जाईल असा इशारा सागर गोरे यांनी दिला.
तसेच शेजारी मार्व्हल फ्रिया सोसायटी लगतच्या जागेतही कचरा टाकला जात असल्याने त्यांनीही आंदोलन केले.
यावेळी आमदार पवार यांनी महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून सोसायटी शेजारी तसेच कचरा डेपोत कचरा टाकू नये अशी विनंती केली, यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ मार्ग काढण्यात येईल अशा आश्वासन दिले.यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्तीत होते.
वाघोली परिसरामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीच्या वेळेस बाहेरील कचऱ्याच्या गाड्या आणून कचरा टाकला जात असल्याचा आरोप देखील येथील नागरिकांनी केला,