रत्नागिरी : स्वतः जगण सोपं आहे, परंतु स्वतः जगता जगता इतरांना जगणं शिकवण आणि त्यांना घडवणं हे फारच कठीण काम आहे आणि हे कठीण काम आविष्कार संस्था मतिमंदांच्या विकासासाठी गेली ३६ वर्षे करीत आहे. आविष्कार संस्थेच्या माध्यमातून सौ. सविता कामत विद्यामंदिर , श्री शामराव भिडे कार्यशाळा, वर्षा चोक्सी बालमार्गदर्शन केंद्र, कै. प्रताप मंगेश कानविंदे शीघ्र उपचार केंद्र, श्रीम. मीरा लिमये उत्पादन केंद्र असे उपक्रम कार्यरत आहेत.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

प्रौढ दिव्यांगाना व्यावसायिक प्रशिक्षण देवून , त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करुन समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये एक उत्पादक घटक बनविण्याकरिता श्री. शामराव भिडे कार्यशाळा गेली ३० वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. आज जवळपास ४० विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन होऊन ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शासकिय मदत मिळवून देवून त्यांना देखील उद्योगाकरिता प्रोत्साहित केले जात आहे.

कार्यशाळा आणि श्रीमती मिरा लिमये उत्पादन केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षाणामध्ये खास दीपावलीकरिता लागणा-या वस्तू मोठया प्रमाणवर तयार करुन त्याची विक्री करण्यात येते. विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः निर्मिती केलेल्या वस्तू विक्री कात असतात त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होवून त्यांची पुढील कौशल्ये विकसित होण्याकरिता मोलाची मदत होत असते.

कार्यशाळेमध्ये सध्या स्टेशनरी मेकिंग, शिवण,क्राफ्ट, गृहशास्त्र , प्राथमिक सुतारकाम, मेणबत्ती, ज्वेलरी असे विभाग कार्यरत आहेत. कार्यशाळेच्या या कार्याची दखल घेत जे. एस्. डब्ल्यू. एनर्जी जयगड गेली सात वर्षे आपल्या आवारामध्ये आविष्कारच्या श्री. शामराव भिडे कार्यशाळा विद्यार्थी निर्मित वस्तू विक्रीसाठी विक्री केंद्राचे आयोजन करीत आहे. वस्तू विक्रीच्या आयोजनाबरोबर वाहतूकीचीही व्यवस्था योग्य रितीने पार पाडून सदर विक्री केंद्राच्या आयोजनाचे वेळी उत्तमरित्या मदतीचा हात देत आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत आहेत.

विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या व्यावसायिक प्रशिक्षणातून निर्माण होणा-या वस्तूंची विक्री करून मिळणारा नफा विद्यार्थ्यांना विभागन दिला जातो. या उपक्रमामळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत अ पुढील कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने मदत होत असते. गेली १५ वर्षे विद्यार्थी विविध स्टॉलच्या माध्यमातून कलादालनाच्या माध्यमातून स्वतः निर्माण केल्या वस्तू विक्री करत आहेत. याचीच प्रेरणा घेवून आज विद्यार्थी वेगवेगळया कार्यक्षेत्रात कार्यरत असतांना दिसत आहेत.

या विक्री केंद्राचे उद्घाटन श्री. किर्ती किरण पुजार – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. मोहित कुमार गर्ग – पोलिस अधीक्षक रत्नागिरी यांचे शुभहस्ते, श्री. परीक्षित दि. यादव – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं ०४.०० वा. स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह , मुख्य प्रवेशव्दार येथे होणार आहे. दि. १८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्याने सायं ०४.०० ते रात्रौ ०९.०० या वेळेमध्ये हे विक्री केंद्र सूरू असणार आहे. या विक्री केंद्राला भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन संस्था अध्यक्ष श्री.बिपीन शहा, संस्था सचिव सौ संपदा जोशी , समिती अध्यक्ष श्री. नितीन कानविंदे आणि व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. सचिन वायंगणकर यांनी केले आहे.